मुंबई :  अँटेलिया स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या आणि परमबीर सिंह पत्रानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. सरकारवर विरोधी पक्षाकडून दररोज जोरदार हल्ले चढवले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही विरोधकांच्या आक्रमक टीकेला उत्तर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सध्या सरकारवर होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.


 पवार म्हणाले की, ' महाविकास आघाडी सरकार समोर असे चॅलेंज ज्या वेळेस येतात त्या वेळेस महाविकास आघाडीचे घटक पक्ष जास्त जवळ येतात', असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 


 तसेच,  'परमविर सिंह यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे' असंही ते म्हणाले