Pune Drugs Racket : शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात (Pune Crime News) अडकल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता पुण्याला ड्रग्जचा विळखा पडतोय की काय? असा सवाल विचारला जातोय. गेल्या तीन आठवड्यात पुणे पोलिसांची बेधडक कारवाई सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत 1800 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलाय. त्यामुळे आता पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलंय की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले रोहित पवार?


राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी पुणे सद्यस्थितीला अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलं असून पिंपरी-चिंचवडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याकडे 45 कोटीचे एमडी सापडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या दोन वर्षापासून पुण्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा अवैध धंदा खुलेआम सुरु असून यांसंदर्भात अधिवेशनात मी स्वत: दोनदा लक्षवेधी मांडली असून शासनाने मात्र सकारात्मक कारवाई केलेली नाही, असं म्हणत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.


सरकारी वरदहस्त असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा सर्रास व्यापार करण्याची या गुन्हेगारांची हिम्मत होऊच शकत नाही. आणि पिंपरी चिंचवडच्या घटनेने हे सिद्ध झाले आहे. केवळ अधिकारीच नाही तर अनेक राजकीय नेते देखील यामध्ये सहभागी असून राज्याच्या युवा वर्गाला नशेच्या आहारी चढवले जात आहे. गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री किमान आतातरी दोषींविरुद्ध कठोर भूमिका घेतील, अशी अपेक्षा देखील रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, काल पिंपरी चिंचवडमध्ये देखील पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी भागातून 80 किलोहून अधिक एमडीड्रग्स जप्त केले. जप्त केलेल्या 80 किलो पेक्षा आधिक ड्रग्सची किंमत जवळपास 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. ग्ज प्रकरणाचा तपास करत असताना एका आरोपीला कोलकत्ता येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची आणि यापूर्वी अटक केलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जात असल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.