मुंबई : ओमनी कारला धक्का देत रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले सांगली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली आहे. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आमदार रोहित पवार अपघातग्रस्त ओमनी कारला बाहेर काढताना दिसत आहे. जखमींना वेळेत उपचार मिळाले. मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान शेतकऱ्याच्या गाडीला एक अपघात झाला होता. आमदार रोहित दादांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढून जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार यांनी त्यानंतर ट्विट करून या अपघाताची माहिती देतानाच अशा अपघाताच्या प्रसंगी मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचं आवाहनही केलं आहे. पोलीस चौकशीला घाबरून अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये, असं ट्विट पवार यांनी केलं आहे.



आमदार रोहित पवार हे कायमच सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात. तरूणाईचे लाडके आमदार म्हणून रोहित पवार लोकप्रिय आहेत.