Rohit Pawar And Kunti Pawar Relationship : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कायमच आपल्या राजकीय विधानांमुळे किंवा कृतीमुळे चर्चेत असतात. आज रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार यांचा वाढदिवस. वाढदिवसादिवशी लिहिलेल्या एका खास पोस्टमुळे रोहित पवार यांची पुन्हा एकदा चर्चा होतेय. रोहित पवार कायमच आपल्या कृतीतून अनेक गोष्टी दाखवत असतात. तशीच त्यांची आताची कृती ही त्यांच्या नात्यातील गुपित उलघडणारी ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार आणि कुंती पवार यांच्या लग्नाला जवळपास 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना दोन गोंडस मुलं आहेत. रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमागे कुंती पवार यांचे मोठे स्थान आहे. उच्च शिक्षित असूनही कुंती पवार यांनी कुटुंब सांभाळण्याचा निर्णय घेतला. घराकडे आणि मुलांकडे लक्ष दिलं. यामुळे रोहित पवार राजकीय क्षेत्रात आपली 100% देऊ शकले. यासाठी त्यांनी यापूर्वीही अनेकदा कुंती पवार यांची कृतज्ञता व्यक्त केलीय. 


आज 29 सप्टेंबर रोजी कुंती पवार यांचा वाढदिवस. या दिवशी रोहित पवार यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 


रोहित पवार यांची पोस्ट 


कुंती पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रोहित पवार म्हणतात की, मी तुझा ऋणी आहे. कारण मला कळस होता यावं म्हणून स्वतः पाया होणारी तूच आहेस… स्वतः तेवत राहून घरभर प्रकाश देणारी पणतीही तूच आहेस… सर्व नात्यांना गुंफणारा धागाही तूच आहेस… आणि संघर्षात लढण्यासाठी बळ देणारी दुर्गाही तूच आहेत…म्हणूनच तू माझी खास आहेस आणि तूच माझा विश्वासही आहेस…


एका नवऱ्याने अशा पद्धतीने व्यक्त होतं हे प्रत्येक पत्नीसाठी खास भावना असते. नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी रोहित पवार यांच्या स्वभावातील 5 गोष्टी प्रत्येकाने शिकायला हव्यात. 



भावना व्यक्त करावी


नात्यामध्ये कायमच आपल्या मनातील भावना व्यक्त करणे अत्यंत गरजेचे असते. रोहित पवार यांनी आपल्या पत्नी कुंतीबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस हे दोन्ही दिवस अतिशय खास असतात. अशावेळी प्रत्येक नवऱ्याने पत्नीबाबतच्या खास भावना व्यक्त कराव्यात. 


कृतज्ञ राहावं 


फक्त पती-पत्नीच्या नात्यातच असं नाही तर सगळ्या नात्यांमध्ये कृतज्ञ असणं गरजेचे असते. पती-पत्नीच्या नात्यातही कृतज्ञ राहायला हवं. रोहित पवार कायमच आपल्या पत्नीची कृृतज्ञता व्यक्त करतात. आपण आज हे काही आहोत यामध्ये कुंती यांचा देखील मोठा वाटा असल्याचं सांगतात. 


कामाची दखल घ्यावी 


आपण ज्याच्यासाठी काही करतो त्या व्यक्तीला जाणीव असणे. हे प्रत्येकाला सुखावणार असतं. अशावेळी पत्नीच्या कामाची दखल पतीने घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पत्नीही सगळ्याच स्तरावर पतीसोबत असते. रोहित पवार यांनी कायमच कुंती या उच्च शिक्षित असून आपल्यासाठी कुटुंब सांभाळत असल्याची जाणीव मनात ठेवली आहे.