Rohit Pawar on Marathi Not Allowed Controversy : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका कंपनीच्या HR ची पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा वाद सुरु झाला. दरम्यान, या घटनेवर राजकारण्यांकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मराठी लोकांची ताकद गुजराती लोकांना दाखवून द्यावी लागेल असं त्यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार यावेळी म्हणाले की "सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढला आहे. वरुन एक आदेश आला की लगेच, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. त्यामुळेच गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचा प्रकार घडत आहे. हे असं होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल. तर काल मराठी मुलीला नोकरी नाकारण्यात आली हे दुर्दैव आहे."


काय आहे प्रकरण? 


गिरगाव परिसरात असणाऱ्या या ग्राफिक डिझायनरच्या नोकरीसाठी HR नं उमेदवारच्या शोधात असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये HR नं सांगितलं की मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. कमीत कमी 1 वर्ष किंवा त्याहून जास्त असा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला कोणत्या कोणत्या गोष्टी या उमेदवाराकडून अपेक्षित आहे हे सांगितलं. सगळ्यात आधी असलेली अट ही होती की 'मराठी माणसाला इथे अर्ज करण्यास परवानगी नाही किंवा मराठी माणूस इथे अर्ज करु शकत नाही.' 


हेही वाचा : 'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट


या जाहिरातीचा स्क्रिन शॉट काही नेटकऱ्यांनी काढला आणि त्यानंतर आधीचं ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली होती. इतकंच नाही तर त्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया मागितली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर HR नं मागितली माफी. यासगळ्या प्रकरणातं गांभीर्य समजताच त्या HR नं एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी उमेदवार शोधत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये असलेल्या फक्त एका वाक्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मी अशाप्रकारे कोणाविरुद्धही कोणत्याही भेदभावाचं समर्थन करत नाही. माझ्या नजर चुकीमुळे मी ती पोस्ट इथे केली होती.