COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी : बातमी झी २४ तासच्या दणक्याची... कोकण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे रविवारी तुतारी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचे दरवाजे आतील प्रवाशांनी उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला होता... ही बातमी 'झी २४ तास'ने दाखवल्यानंतर सोमवारी सर्व रेल्वेच्या डब्यांमध्ये आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक स्थानकात रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे उघडले जात होते...


गणेश विसर्जनच्या अदल्या दिवसापासून म्हणजे रविवारपासून कोकणातील चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघालेत. तळ कोकणातूनच रेल्वेचे डबे भरून येत असल्यामुळे राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड स्थानकात रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे उघडले जात नव्हते. ही बातमी 'झी २४ तास'ने दाखवल्यानंतर सोमवारी कोकण रेल्वेला हे नियोजन करावं लागलं होतं. 


सावंतवाडी स्थानकापासूनच आरपीएफ, होमगार्ड आणि स्पेशल फोर्सचे जवान प्रत्येक डब्यात तैनात केल्यामुळे प्रत्येक स्थानकात रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे उघडले जात होते. त्यामुळे प्रवाशांना निदान डब्यांमध्ये प्रवेश मिळत होता.