Mohan Bhagwat Poppulation Rate: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी कमी होत चाललेल्या लोकसंख्या दराबाबत चिंता व्यक्त केली आहे.  लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, असे लोकसंख्या शास्त्र सांगते. हा चिंतेचा विषय असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले. 


काय म्हणाले मोहन भागवत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसंख्या शास्त्र सांगते लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको असे लोकसंख्या शास्त्र सांगते. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे म्हणजे कमीत कमी तीन असावेत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.



या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही असे उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे.. लोकसंख्या शास्त्र सांगतो की लोकसंख्या वाढीचे दर 2.1 पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो. तो समाज जगाच्या पाठीवर नसतो. त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे असे मोहन भागवत म्हणाले.


आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 1998- 2002 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की, 'लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये'. असा उल्लेख करत भागवत म्हणाले की, आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. मग जर 2.1 एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग तीन पाहिजे कमीत कमी असं भागवत म्हणाले.