पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय चिंतन आजपासून पुण्यात सुरू होतेय.  पुढचे पाच दिवस देशभरातून आलेले संघाचे ८० वरिष्ठ पदाधिकारी देशातील सामाजिक आणि राजकीय स्थितीबद्दल संघाच्या दृष्टीकोनावर मंथन करणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवतही बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.  २००७ मध्ये धर्मस्थल इथं झालेल्या बैठकीनंतर तब्बल ११ वर्षांनी अशा प्रकारची बैठक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत नेमक्या कुठल्या विषयांवर चिंतन होणार याबद्दल उत्सुकता आहे.  बैठकीत २०१९ च्या निवडणुकीबाबत कुठल्याच प्रकारची चर्चा होणार नसल्याचा दावा संघातर्फे करण्यात आलाय.