विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत असतानाच पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुलांच्या आरोग्याकडे (health of children) अधिक लक्ष देण्याची गरज आहे.  कारण RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे.  संभाजी नगरमध्ये (Sambhajinagar) या व्हायरसने थैमान घातले आहे. बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RSV (Respiratory Syncytial Virus), Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुलांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला, आदी लक्षणे दिसत आहेत. ही लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवा, असं आवाहन केले जात आहे. हिवाळ्यात लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहेत. मुख्यत: श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण सौम्य ते मध्यम स्वरुपाचे आहेत.


काय आहे हा Adenoviruses?


अॅडिनोव्हायरस हा एक विषाणू आहे जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत परंतु या उद्रेकामागे एडेनोव्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते. एडेनोव्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात


एडेनोव्हायरसमुळे मृत्यू होत नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर हा विषाणू परिणाम होतो. RSV, Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरस पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेणं टाळा.  पौष्टिक आहार द्या.. स्वच्छतेचे नियम पाळा. लहान मुलांना हात धुण्याची सवय लावावी. इन्फ्लुएंजाची लस घेणं आवश्यक आहे.


यातील RSV हा व्हायसर हा एक वर्षाखालील मुलांना त्रास देतो. तर Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे एक वर्षाच्या बाळापासून ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये दिसत आहेत. या चार व्हायरसपासून आपल्या मुलांना सांभाळा. 


या चारही व्हायरसचा प्रसार हवेतून होतो. यातील Influenza A (H3N2) Variant Virus आणि Adenoviruses हे व्हायरस मुलांना अधिक त्रासदायक आहेत. त्यामुळे मुलांची काळजी घ्या, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितले.