Rupali Chakankar On Bharat Gogawale: सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना (Maharastra Politics) वेग आल्याचं दिसून येतंय. एकीकडे मंत्रिमंडळ (Cabinate Expansion) विस्ताराच्या हालचाली सुरु असताना तर दुसरीकडे मलईदार खात्यांसाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच होताना दिसते. अशातच आता महायुती सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय, महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं वादग्रस्त वक्तव्य. भरत गोगावले यांनी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता मोठा राडा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच आता अजित पवारांची वाट धरलेल्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गोगावलेंना खडे बोल सुनावले आहेत.


काय म्हणाल्या चाकणकर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, असं चाकणकरांनी म्हटलं आहे.


भरत गोगावले, आपण त्या जिल्ह्यातून येता जिथं संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो, जिथं विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना 'सखी  राज्ञी जयती' असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, असं म्हणत रुपाली चाकणकरांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे. 


पाहा ट्विट -



नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?


पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का?  मला आमदारकीचा 15 वर्षांचा अनुभव आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करु. महिला आणि पुरुष थोडा तर फरक येतोच ना, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं होतं.


आणखी वाचा - Rohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस...; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार झाले भावूक!


दरम्यान, भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर सर्वच पक्षात टीका होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील टीका करण्याची संधी सोडली नाही.