त्या महिला खासदाराने आवाज उठवला असता, तर त्या कार्यक्षम महिला अधिकाऱ्याचा जीव वाचला असता
वनविभागात RFO असलेल्या दीपाली चव्हाण यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. पण यापूर्वी त्यांनी
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : वनविभागात RFO असलेल्या दीपाली चव्हाण यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. पण यापूर्वी त्यांनी हा त्रास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सांगितला होता. रेकॉर्डिंग ऐकवली होती, दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख आहे. आता या प्रकऱणावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. "खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्यासाठी आवाज उठवायला हवा होता, तर त्या कार्यक्षम महिला अधिकाऱ्याचा जीव वाचला असता".
वरिष्ठ अधिकाऱ्याने कसा घेतला महिला अधिकाऱ्याचा जीव
वनविभागात RFO असलेल्या दीपाली चव्हाण यांनी डोक्यात पिस्तुलाने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. DFO विनोद शिवकुमार हे त्यांना कुठल्या न कुठल्या प्रकारे त्रास देत होते, अपरात्री काम नसतानाही घरी बोलवत होते, ऍट्रोसिटीची धमकी देत होते.
ऍट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी
ऍट्रोसिटीचा खोटा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल होता. उलट दीपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी शिव्या दिल्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे, असं दीपाली चव्हाण यांचे पती मोहिते यांनी म्हटलं आहे.
सर्व बाजूंनी दीपाली चव्हाणला त्रास दिला
एवढंच काय दीपाली गर्भवती असताना तिला कच्च्या रस्त्यावर चालवून चालवून तिचा गर्भपात केला. शिवकुमारला जे पाहिजे ते दीपाली चव्हाणने ऐकलं नाही, याचाच राग म्हणून हे सर्व काही चाललं होतं, दीपालीचं वेतन देखील शिवकुमारने रोखलं होतं. हे दीपालीच्या सुसाईड नोटमधूनही स्पष्ट होत आहे. कारण तिने तिच्या पश्चात वेतन काढण्याची विनंती केली आहे, आणि हे वेतन माझ्या आईला द्या अशी विनंती देखील दीपालीने सुसाईड नोटमध्ये केली आहे.