Pune Kasba Bypoll Election: मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलेल्या आक्रमक नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. त्याच्या आक्रमक भूमिकेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मात्र, त्या सध्या चर्चेत आल्यात एका फेसबुक पोस्टमुळे (Facebook Post). सकाळी 7 च्या सुमारास ठोंबरे यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba Bypoll Election) पार्श्वभूमीवर फेसबुक पोस्ट केली. ईव्हीएमचा (EVM) फोटो शेअर केल्याने मोठा वाद झाल्याचं पहायला मिळतंय. 


रूपाली ठोंबरे पाटील यांची पोस्ट आहे तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईव्हीएममध्ये (EVM) मतदान करतानाचा फोटो रूपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट (Rupali Thombare Patil Facebook Post) केला आहे. कसबा मतदार संघाच्या उमेदवारांची यादी या फोटोमध्ये दिसत आहे. तर कोणा एका मतदाराने रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना वोट केल्याचं या फोटोमध्ये दिसतंय. त्याचा हा फोटो रुपाली ठोंबरे पाटील यांनी शेअर केलाय. त्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी होताना दिसत आहे.


शुभ सकाळ... कसब्याचा नव्या पर्वाची ,कामाची सुरवात
आपला माणूस ,कामाचा माणूस...कसबा मतदारांचा, असं त्या पोस्टला मथळा देताना म्हटल्या आहेत.


पाहा facebook पोस्ट -



रूपाली ठोंबरेंचं स्पष्टीकरण (Rupali Patil Explanation)


एका मतदारानं मला रविंद्र धंगेकर यांना मतदान केल्याचा फोटो शेअर केला. त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर आणि माझा व्हॉटस स्टेटस ठेवलाय. मी अजून मतदान केलेलं नाही. माझ्यावर जे आरोप करीत आहेत त्यांनी माझ्या मतदान केंद्रावर जाऊन पाहून यावं की मी मतदान केलंय की नाही, असं स्पष्टीकरण रुपाली ठोंबरे (Rupali Patil On facebook Post) यांनी दिलंय. 


मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही, असं म्हणत त्यांनी टिळकांच्या कसब्यात टिळक्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. मी साडेचार वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.


आणखी वाचा - Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!


रुपाली ठोंबरे पाटील यांचा भाजपवर निशाणा


रुपाली ठोंबरे पाटील यांनी हेमंत रासने यांचा नूमवी मतदान केंद्रातील फोटो शेअर केला. कसबा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर उमेदवार पक्षाचा मफलर घालून मतदान करणे गुन्हा नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्यावी. सत्ताधारी यांनी कायद्यानी राज्य चालवावे, असं त्या म्हणाल्या.


हेमंत रासने VS रविंद्र धंगेकर


कसबा विधानसभा (Kasba Bypoll Election) मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात जोरदार फाईट पहायला मिळत आहे. यासह इतर 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, त्याआधी हायव्होल्टेज ड्रामा (Pune News) पहायला मिळत आहे.