Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!

Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

Updated: Feb 26, 2023, 12:21 PM IST
Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर! title=
Chinchwad ByPoll Election

Pune Bypoll Election: कसबा पेठ (Kasaba Bypoll Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll Election) आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिडणुकीचं वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. भाजप (BJP) आणि महविकास आघाडी (MVA) अशी थेट लढत रंगणार असल्याचं चित्र असल्याने सर्वांच्या नजरा पोटनिवडणुकीकडे वळल्या आहेत. अशातच आता पुण्यातून धक्कादायक माहिती (Pune News) समोर आलीये. (chinchwad bypoll election clash between supporters of angholkar and rahul kalate on voting day latest marathi news)

भाजप समर्थक नगरसेवक सागर आंघोळकर (Sagar Angholkar) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांच्यात पिंपळे गुरव (Pimple Guruv) मध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ (Video) देखील समोर आल्याचं पहायला मिळतंय.दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा (Pune Police) मतदानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video - 

चिंचवडमध्ये तिरंगी लढत 

चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll Election) भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. येत्या 2 मार्च रोजी निकाल असणार आहे. चिंचवडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. मतदानापूर्वी राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं होतं. त्यामुळे वाद देखील पेटल्याचं दिसून आलं.

Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!

दरम्यान, महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात आला होता. खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनी रॉली काढली तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपली बाजू लावून धरली होती. त्यामुळे आता दोन जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मतदानाला चांगला प्रतिसाद - 

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह (Pune Bypoll Voting) पार पडत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कसब्यात 6.5% तर चिंचवडमध्ये 3.52% मतदानाची नोंद झाली आहे.