जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये भरधाव टँकरनं चौघांना चिरडल्याची घटना घडली. चौघा मृतांमध्ये तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. तर तीन जखमी आहेत. या भीषण अपघातामुळे पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. 


चौघा मृतांमध्ये तीन चिमुरड्यांचा समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आलेत. निन्नेबाई पवार, अलकोस पवार, उडदीश पवार आणि अमरसिंग पवार अशी मृतांची नाव आहेत. तर निहाल पवार हा अतिशय गंभीर आहे. 


घटनास्थळावरुन टॅंकर चालक फरार


निहालनी पवार आणि गोधम पवार हेही जखमी आहेत. घटनास्थळावरुन टॅंकर चालक फरार झाला असून पोलिसांनी टॅंकर ताब्यात घेतला आहे.