MPL 2023, Ruturaj Gaikwad : महाराष्ट्र प्रिमियम लीगच्या (MPL 2023) यंदाच्या हंगामास धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. पहिला सामना पुणेरी बाप्पा आणि  कोल्हापुर टस्कर्स (Puneri Bappa vs Kolhapur Tuskers) यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या धुंवाधार खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पाने पहिला विजय नोंदवला आहे. कोल्हापुर टस्कर्सला 8 विकेट्सने पराभूत करत पुणेरी बाप्पाने विजयाचं खातं उघडलं आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि पवन शाह (Pawan Shah) या दोघांनी सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. पुणेरी बाप्पाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 27 चेंडूत 64 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय पवन शाहने 48 चेंडूत 57 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याने या सामन्यात 230 च्या अधिक स्टाईक रेटने आतिषबाजी केली. त्यावेळी त्याने भल्या भल्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं.


आणखी वाचा - World Cup आधी मोठी भविष्यवाणी; ना ऑस्ट्रेलिया ना पाकिस्तान, 'ही' टीम ठरणार भारतासाठी धोक्याची घंटा!


कोल्हापूर टस्कर्सच्या गोलंदाजांसाठी तो निराशाजनक दिवस होता. कोल्हापूर टस्कर्सकडून श्रेयस चव्हाण आणि तरनजीत सिंग यांना 1-1 विकेट मिळाली. या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्स संघाने 20 ओव्हरमध्ये 144 धावा केल्या. अशाप्रकारे पुणेरी बाप्पासमोर सामना जिंकण्यासाठी 145 धावांचे लक्ष्य होतं.


पाहा Video



दरम्यान, फक्त 22 बॉलमध्ये ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अर्धशतक पूर्ण केलं. लाँग ऑफ असो वा लाँग ऑन... कोणत्याही फिल्डरला ऋतुराजचे फटके रोखता आले नाहीत. कोल्हापूर टस्कर्सकडून अंकित बावणे (Ankit Bawane) याने 57 चेंडूत सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 7 फोर आणि 1 सिक्स मारला. त्याचबरोबर केदार जाधवने 22 चेंडूत 25 धावांची उपयुक्त खेळी केली.