`साथ जियेंगे, साथ मरेंगे`च वचन देत एचआयव्ही बाधित अडकले विवाह बंधनात
एचआयव्ही बाधित सात जोडपे अडकले विवाहबंधनात, जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान..
जालना : एचआयव्हीग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. मात्र, या घटकातील सात जणांना एकत्र आणून त्यांना आधार देण्याचं काम जिल्हा प्रशासनाने केलंय.
जिल्हा प्रशासन आणि बीडमधील सामाजिक संघटना एकत्र आल्या. त्यांनी एचआयव्ही असलेल्या सात जोडप्यांचा विवाह सोहळा घडवून आणला. एचआयव्ही झाल्यामुळे व्यथित होऊन निराशामय जीवन जगणाऱ्या त्या एचआयव्ही ग्रस्तांना आता कायमस्वरूपी एकमेकांचा आधार मिळालाय.
हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने या नवीन जोडीदारांनी आनंदी जीवन जगण्याची उमेद घेऊन या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून सर्व नव दाम्पत्याला लग्नाचा आहेर म्हणून कौटुंबिक सामान देण्यात आले.
बीड येथील 'हेल्थ केअर कमुनिटी ऑफ पॉझिटिव्ह पीपल्सच्या विहान प्रकल्पाने 'जुळून येती रेशीमगाठी' या अंतर्गत हा विवाह सोहळा घडवून आणला होता.