सचिन अंदुरेची पोलीस कोठडी संपली, आज पुणे न्यायालयात
सीबीआय आणि एटीएसनं एकत्र कारवाई करत, सचिन अंदुरेला अटक केली होती.
पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या सचिन अंदुरे याची पोलीस कोठडी संपलीयं. त्याला आज पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.. सीबीआय आणि एटीएसनं एकत्र कारवाई करत, सचिन अंदुरेला अटक केली होती.
गोळी झाडल्याचा दावा
सचिन अंदुरेनेच दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला गोळ्या झाडून पुण्यात ओंकारेश्वर पुलावर हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात अवैध शस्त्रसाठा प्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीचाही हात असल्याचं तपासात समोर आलंय.
सचिन अंदुरे औरंगाबादच्या राजा बाजार परिसरात राहतो. पत्नी आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब आहे.