पुणे : जम्मू काश्मीरात आत्मघातकी हल्ल्यासाठी गेल्याचा आरोप पुण्यातल्या सादिया शेख या तरूणीने फेटाळलेत. मी शिक्षणासाठी काश्मिरात गेले होते. तिथे पेपरात बातमी वाचल्यावर मी स्वतः पोलिसांसमोर हजर झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर मला आईच्या स्वाधीन केलं, असं सादिया शेखनं म्हटलंय. तर २०१५ मध्ये जे घडलं. त्यामुळे सादिया मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातून एकदाची मुक्त होण्यासाठी तिला बाहेर शिक्षणासाठी पाठवण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार ओळखीतल्या लोकांच्या मदतीने तिला तिथल्या कॉलेजात प्रवेश घेतल्याचं सादियाच्या आईने म्हटलंय. 


काश्मीर येथून संशयित आत्मघातकी गर्ल म्हणून सादियाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिचा लष्कल-ए-तैय्यबा या अतिरेकी संघटाशी संपर्क होता, असा आरोप करण्यात आला होता. ती पुण्यातून काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी गेली होती, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, सादियाने हे सर्व आरोप फेटाळले आहे.