शिर्डी : शिर्डीत साई दर्शनासाठी जाणा-या दानशूर साई भक्तांना आता साई संस्थानकडून रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. २५ हजाराच्यावर दान करणा-या भक्तांना साईंचा आशिर्वाद म्हणून आजपासून 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं, साई कॅलेंडर आणि साई चरित्र भेट स्वरुपात दिलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर राज्याचे जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते आज २ लाख रुपयांची देणगी देणा-या साईभक्त सलीम फातिमा यांना पहिली भेट देऊन गौरवण्यात आलं. साईभक्तांना देण्यात येणा-या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला साईंच्या पादुका तर दुस-या बाजूला साईंच्या मंदिराच्या कळसाचं चित्र आहे... 


साई संस्थानला भक्त मोठया प्रमाणात साईभक्त सोने आणि चांदीचे दागिने दान करतात यातील काही दागिने हे वापरण्या योग्य नसतात त्या दागिन्यांचा पूर्वी साईसंस्थान लिलाव करत असे तर सोन्याचे दागिने वितळवून त्याची शु्ध्द नाणी बनवून ती भक्तांना विकली जात असे मात्र या योजनेत काही आक्षेप घेतले गेल्यानंतर हायकोर्टाने त्यास बंदी घातली होती आता साईसंस्थानने चांदी वितळुन ही नाणी तयार केली जातात.