Kalicharan Maharaj Controversial Statement : कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी बॉलिवूडला लक्ष्य करत टीका केली आहे. पठाण असो वा अन्य कोणताही चित्रपट... या सर्वांवर बहिष्कार टाका,असे आवाहन कालीचरण महाराज यांनी प्रेक्षकांना केले आहे.


काय म्हणाले कालीचरण महाराज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्माच्या विरोधात जाऊन सिनेमा बनवणाऱ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे, तसेच अशाप्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना भिकारी बनवा, असे विधान कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले आहे. तसेच हिंदू धर्माचा अपमान करणार्‍या सर्व देशद्रोही चित्रपटांवर पूर्णपणे बहिष्कार घाला, आणि अशाप्रकारे धर्माचा अपमान करणार्‍यांना धडा शिकवा, असे आवाहन कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj)  यांनी सर्व हिंदू बंधू-भगिनींना केले आहे.  


पठाण असो वा अन्य कोणताही चित्रपट...या सर्वांवर बहिष्कार टाकलाच पाहिजे. असे चित्रपट बनवणाऱ्यांना भिकारी बनवले पाहिजे. त्यांच्यासाठी हीच शिक्षा आहे. धर्माचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे देखील कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी म्हटले आहे.दरम्यान असे विधान करून त्यांनी बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. 


दरम्यान याआधी त्यांनी काही दिवसांपुर्वीच 'डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा' आणि 'मुलीला प्यायला द्या', 'मग डोकं ठिकाण्यावर येईल', 'सर्व भूत प्रेम तंत्र मंत्र बाहेर येईल', असा दावा कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj)  केला होता. त्यांच्या या विधानाची खुप चर्चा रंगली होती.