रायगड : पारंपरिक गणेशोत्सव संपल्यानंतर रायगडात आता साखरचौथीच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हयात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. वाजत गाजत गणेशमूर्ती मंडपात आणण्यात आल्या. भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला या गणपतीची स्थापना केली जाते. पुराणात अशा गणेशोत्सवाचे दाखले नाहीत. 


वर्षभर गणेशमूर्ती बनवणा-या कारागिरांना पारंपरिक गणेशोत्सवात सहभागी होता येत नाही. त्यांनी एकत्र येत हा गणेशोत्सव साजरा केला. सुरूवातीला केवळ पेण पनवेल तालु्क्यात असलेल्या या उत्सवाचे लोण अलिबाग, उरण  आणि अलिबागपर्यंत पोहोचलंय.