सोनू भिडे, नाशिक: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरण ताजे असतानाच जिल्हा शासकीय रुग्णालयातील अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवत दोन संख्या बहिणींनी 16 जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तापस करत आहेत.  


अशी झाली फसवणूक


संशयित दोघ बहिणी फरीन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख ह्या नाशिकमध्ये राहतात. परिसरातील नागरिकांना आपण जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी करतो असे भासविण्यात आले. रुग्णालयात वरिष्ठांशी आपली ओळख आहे असे सांगून रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष तरुण मुलांना दाखवण्यात आले. सख्या बहिणींनी रुग्णालयातील पोशाख परिधान करून त्यांना रुग्णालयातील कामकाज सुद्धा दाखवले असल्याच पिडीत तरुणांनी सांगितले आहे. या तरुणांकडून नोकरीकरिता लाखो रुपयांची मागणी करण्यात आली होती. 


असे झाले उघड


नाशिक मधील खडकाळी परिसरात राहणारे अरबाज सलिम खान (वय २४) यांना संशयित आरोपींनी नोकरीचे आमिष दाखविले होते. फेब्रुवारी महिन्यात अरबाज आणि संशयित आरोपींची भेट झाली होती. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष अरबाज ला दाखवण्यात आले होते. फेब्रुवारी २०२२ पासून ते आज तागायत आरोपींनी अरबाज कडून  एक लाख बावीस हजार रुपये घेतले होते. मात्र सात महिने होऊनही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाली असल्याच अरबाज च्या लक्षात आल्याने त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


कोण आहेत ह्या सख्या बहिणी


संशयित दोघ बहिणी फरीन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख ह्या नाशिकच्या नाईकवाडीपूरा येथील अजमेरी मशिदीजवळ राहतात. दोघंही जिल्हा शासकीय रुग्णालयात कामाला नसून एक खाजगी कंपनीत कामाला आहे तर दुसरी बेरोजगार आहे. कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी त्यांनी मुलांना फसविल्याच पोलिसांच्या प्रतःमिक तपासात उघड झाल आहे. 


पोलिसांनी केले आवाहन


संशयित आरोपींनी शहरातील तसेच जिल्हातील इतर कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.