पगार थकवला, दुकानात घुसून मालकाला मारहाण
Workers Beat the owner At Kalyan :काम करुनही एक पैसा न दिल्याने संतप्त कामगाराने मालकालाच मारहाण करण्याची घटना घडली.
कल्याण : Workers Beat the owner At Kalyan :काम करुनही एक पैसा न दिल्याने संतप्त कामगाराने मालकालाच मारहाण करण्याची घटना घडली. वर्षभरापासून थकलेला पगार न दिल्याने दोन कर्मचाऱ्यांनी दुकानातून गोंधळ घातला आणि दुकान मालकाला मारहाण केली. कल्याणात घडलेल्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात संतोष गुप्ता यांचे विघ्नहर्ता नावाने स्टील खरेदी विक्रीचा दुकान आहे . वर्षभरापूर्वी त्यांच्याकडे हुसेन आणि परवेश हे दोघे काम करत होते. वर्षभरापासून पगाराचा हिशोब न दिल्याने या दोघांनी गुप्ता यांना वारंवार विचारणा केली. गुप्ता यांनी दोघांना बोलवून हिशोब देतो, असं सांगितले. मात्र त्याच दिवशी या तिघांमध्ये वाद झाला.
या वादात कर्मचाऱ्यांनी दुकानात गोंधळ केला. यावेळी कामगारांनी गुप्ता यांनादेखील मारहाण केली . ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांनी दिली.