लसूणचा तपास करा कसून; बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री
Garlic Price Hike : बाजारात सध्या सिमेंटच्या लसूणची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.
Akola Crime News : स्वयंपाक घरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच लसणाचा काळाबाजार करणारे, चक्क सिमेंटचं लसूण विकत आहेत. बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री होत आहे. या विचित्र फसवणुकीमुळे ग्राहक आश्चर्यचिकत झाले आहेत.
अकोला शहरातील एका निवृत्त पोलीस कर्मचा-याच्या पत्नीनं घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण खरेदी केलं. त्यामध्ये हुबेहुब लसणासारख्याच दिसणा-या लसणाच्या गाठी त्यांना दिसल्या. मात्र ती सोलली जात नसल्यानं त्यांनी ती चाकूनं कापली, तेव्हा सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेली ती बनावट लसूण असल्याचं उघड झालं. वजनात जास्त असल्यानं काळाबाजार करणारे अशी फसवणूक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
स्वयंपाक घरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. यातच काही लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवीत नागरिकांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे.
अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे बनावट लसुन विक्री करीत असल्याचे दिसून येत आहेय. अकोला शहरातील पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याची प्रकार उघडकीस आला आहेय..सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून एक पाव लसूण विकत घेतले.
आज सकाळी लसूण भाजी करिता वापरण्यासाठी घेतले असता यामधील एक लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजनल लसनासारखी दिसून आली मात्र होती ती आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवलेली. लसूण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंट पासून बनवली असून यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आलाय हे त्यांच्या लक्षात आलं.
सदर लसणाच वजन सुमारे शंभर ग्रॅम एवढं आहेय. अकोला शहरांमध्ये सध्या लसणाचे भाव हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले असून काही लसणाची काळाबाजारी करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत सक्रिय झाल्या असून या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहेय...अकोला शहरातील किरकोळ भाजीविक्रेते यांच्याकडून लसुन घेताना नागरिकांनी काळजीपूर्वक विकत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहेय.