मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्र्यांना (CM) भेटायला गेलेल्या संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. (sambhaji bhide has insulted a woman journalist in the mantralaya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी भिडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM  Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी आले होते. भेट झाल्यावर माघारी जात असताना भिडे यांना एका वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया दिली नाही. 


आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. महिला पत्रकाराच्या कपाळावर टिकली नाही म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आणि अपमान केला. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणामध्ये स्त्रियांच्या सन्मानाबाबत बोलत असतात, त्यामुळे आता यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, संभाजी भिडे यांनी याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. भिंडेंच्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.