विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सातत्याने भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राऊत हे विरोधकांवर निशाणा साधत असतात. अशातच त्यांनाही विरोधकांकडून प्रत्युत्तर देण्यात येतं. आता विधानसभेचे माजी सभाजपती हरिभाऊ बागडे (haribhau bagade) यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणारे लहान मुलासारखे आहेत. त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही अशी टीका भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळं व्यवस्थीत चालू असताना काय त्रास आहे?


"संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता काही ना काही बोलतात. त्यामुळे आता आम्ही सकाळी टीव्ही बघणे बंद केलय. सगळं व्यवस्थीत चालू असताना काय त्रास आहे? तुम्हाला काही त्रास असेल तर अधिवेशनात विचारा," अशी टीका मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. म्हणाले


"संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणारे लहान मुलासारखे आहेत. ज्याकडे कोणीच लक्ष देत नाही. संजय राऊत रोज काही बोलत असतात. त्यांचे किती मनावर घ्यायचं याचा विचार करायला पाहिजे. संजय राऊत म्हणजे सामीलबाजा आहे. सामीलबाजा म्हणजे बँड पथकात खुळखुळा वाजवणारा लहान मुलगा," अशा शब्दात हरिभाऊ बागडे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.


दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थ्यांची आणि बँक अधिकाऱ्यांची चर्चा व्हावी यासाठी महामंडळाने संभाजी नगरात संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. या संवाद मेळाव्याला भाजपचे मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते.


यावेळी हजारो  मराठा समाज बांधव उपस्थित असून योजनांविषयी महिती घेताय यातून लाभार्थीना फायदा होईल असं मत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं. तर मराठा समाजातील ज्या युवकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज लागतो ते युवक, सर्व बॅंकांचे कर्मचारी आलेत. भविष्यात याचा सर्व युवकांना लाभ होईल, असे सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर ही स्कीम फडणवीस मुख्यमंत्री असताना  2014 मध्येच लागू केली होती. ती आता आम्ही पुन्हा सुरू केली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच काम करत नाही  असेही सावे म्हणाले.