Bhagat Singh Koshyari Resignation : सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असं म्हणत संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ( Maharashtra Political News) खरंतर दोन महिन्यांपूर्वी हा निर्णय घ्यायला हवा होता. सुसंस्कृत राज्याची राज्यपालांनी घडी मोडलीय, आता नव्या राज्यपालांनी जुन्या चुका ज्या झाल्या, त्या लक्षात ठेवाव्या, असं संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तर महाराजांवर टीका करणाऱ्यांची लायकी काय, असा सवाल उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी केला आहे. (Angry reaction of Sambhaji Raje and Udayan Raje Bhosale on Bhagat Singh Koshyari Resignation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.  त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल कोश्यारी हे अनेक वादग्रस्त वक्तव्यावरुन वादाच्या भोव-यात सापडले होते. तेव्हा कोश्यारींचा राजीनामा घ्या अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि विरोधकांनीही केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारीला मुंबई दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल पद सोडण्याची इच्छा भगतसिंह कोश्यारांनी व्यक्त केली होती. 


Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी


राज्यपालांनी चिंतन मनन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली. विरोधी पक्षाने सर्व मर्यादा ओलांडून त्यांच्यावर टीका केल्याची खंत मुनगंटीवारांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या राजीनामा मंजूर होताच पुण्यात मराठा क्रांती मोर्चानं आनंदोत्सव साजरा केला.. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधीका-यांनी लाल महालासमोर फटाके फोडत साखर वाटली.


Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर


राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना पायउतार व्हावं लागल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. तर नवे राज्यपाल हे बैस आहेत की बायस? त्यांनी घटनेनुसार काम केलं तर स्वागतच आहे असं म्हणत राऊतांनी बैस यांच्यावर उपरोधिक टोला लगावला आहे. तर भगतसिंह कोश्यारींना भाजपनं दिलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं काम पूर्ण झालं, म्हणून राज्यपालांचा राजीनामा मंजूर केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले आहे.   


भगतसिंह कोश्यारी यांना कोल्हापूरमधून विरोध वाढतोच आहे. कोश्यारींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारीला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय.सर्वपक्षीय कृती समितीनं हा बंद पुकारण्याची घोषणा केलीय. 16 तारखेला शिवाजी विद्यापीठात राज्यपाल दीक्षांत समारंभ सोहळ्यासाठी येणार आहेत. मात्र ठाकरे गटासह आता सर्वपक्षीय कृती समितीनं कोश्यारींना  कोल्हापुरात येण्यासाठी विरोध केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत कोश्यारींना कोल्हापुरात जोरदार विरोध होतोय.