भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या छिंदवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. संतप्त नागरिकांनी चक्काजाम केला. आंदोलनानंतर अखेर पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली. यावर छत्रपती संभाजी राजेंनी ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात? असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही.' असं पहिल्या ट्विटमध्ये संभाजी राजेंनी म्हटलं आहे. 



तसेच त्यांनी दुसरं ट्विट देखील केलं आहे. यामध्ये 'हा' व्हिडिओ पाहून मन हेलावल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं.



मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही.' हे दोन्ही ट्विट त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मध्यप्रदेशचे मु्ख्यमंत्री कमलनाथ यांना टॅग केले आहेत.