Crime News : मुलाच्या हत्येनंतर सहा वर्षांनी मारेकराचा शोध घेण्यास त्याच्या आईला अखेर यश आले. पोटच्या मुलाची हत्या करुन मारेकरी फरार झाला होता. त्याच्या मागावर मुलाची आई होती. मात्र, प्रत्येकवेळी मुलाचा मारेकरी चकवा देत होता. दरम्यान, मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सहा वर्षे झाली तरी पोलिसांनी हा खुनी सापडत नव्हता. एका लग्नाला आपल्या पोटच्या मुलाचा मारेकरी येणार असल्याची माहिती मिळताच माऊली थेट लग्न मंडपात दाखल झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता. मुलाची हत्या झाल्यामुळे त्याची आई अस्वस्थ होती. मुलाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी आईने देखील सातत्याने पाठपुरावा केला. यात सहा वर्षे गेलीत. मात्र, आईच ती. ती हरली नाही. तिने शोध सुरुच ठेवला. अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला.


एका नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी खुनी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. तिने कशाचाही विचार न करता विवाहाच्या ठिकाणी धडक मारली आणि आईने आरोपीला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधली.


याबाबत पोलिसांनीकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील कोळेगाव येथे अमोल सखाराम बळे या तरुणाची  जून 2018 मध्ये हत्या झाली होती. अमोल याची हत्या करणारा रवींद्र पंडुरे हा तेव्हापासून फरार होता. दरम्यान, मुलाच्या खूनप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटना घडल्यापासून तो फरार होता. तब्बल सहा वर्षे खुनी आरोपी चकवा देत होता. पोलिसांनी शोध लागला नाही मात्र, पीडीत मुलाच्याच आईने त्याला शोधून काढले.


आपल्या पोटच्या गोळ्याचा खून झाल्यानंतर माऊली खूप अस्वस्थ होती. तिने या आरोपीचा सहा वर्षापासून शोध सुरुच ठेवला होता. माहिती मिळाली की त्याठिकाणी जायची. मात्र, तिच्या हाती निराशाच यायची. मात्र, एका लग्नात तो येणार असल्याची माहिती मिळताच माऊलीने सोबत पोलिसांनाही घेतले आणि लग्नमंडपात धडक मारली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेला मुलाचा गुन्हेगार असलेला मारेकरी सापडला.


आरोपी रवींद्र हा पैठण येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पीडीत मुलाच्या आईने पैठण पोलिसांसह लग्न मंडप गाठला. त्या ठिकाणी असलेला आरोपी पोलिसांना दाखवला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. सहा वर्षांपूर्वी खून झालेल्या मुलाच्या खुन्याचा शोध स्वतः आईने लावून पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे आईच्या जिद्दीला सलाम ठोकण्यात येत आहे.