विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील एक प्राध्यापक आपल्याच विद्यार्थिनीचा दोन वर्ष लैंगिक छळ (Sexual Harassment) करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक म्हणजे पत्नीच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरु होता. इतकंच नाही तर पत्नी त्या प्राध्यापकाला (Professor) या प्रकार मदतही करत होती. या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर आणि पत्नी पल्लवी बंडगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमका प्रकार?
विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी पीडित विद्यार्थिनी वसतिगृह शोधत होती. प्राध्यापक बंडगर स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून त्या मुलीला राहण्यास घेऊन आले. आरोपी बंडगरच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचं आश्वासन तिला दिलं. जुन 2022 मध्ये पहिल्यांदा बंडगरने तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, पण याला तीने विरोध केला. त्यानंतर जुलै 2022 मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडित मुलगी झोपली असताना बंडगरने बळजबरीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 


आरोपीला पत्नीचीही साथ
जानेवारी 2023 मध्ये हा सर्व प्रकार मुलीने बंडगरच्या पत्नीस सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य आहे. तू आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचं तीने सांगितलं. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटलं आहे


आरोपी बंडगर फरार
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राध्यापक बंडगर पत्नी आणि दोन मुलींसह फरार आहे. ग्रामीण भागातून आलेल्या मुलीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या या घटनेने संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी प्राध्यापकावर कोठर कारवाईची मागणी केली असून विद्यापीठाच्या नावालाही गालबोट लागलं आहे. 


विद्यापीठाने केलं निलंबित
दरम्यान, बलात्काराचा आरोप असलेल्या प्राध्यापक अशोक बंडगर याला अखेर कुलगुरूंनी निलंबित केलं आहे.. बलात्कार प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येतेय तसंच त्यांच्यावर पोलिसातही गुन्हा दाखल आहे. त्यानुसार आता विद्यापीठांना निलंबनाची कारवाई (Action of suspension) केलेली आहे.. विद्यार्थिनी सोबतच या प्राध्यापकांना कुकर्म केला आहे त्याबाबत विद्यापीठ स्तरावर चौकशी सुद्धा होणार आहे