मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याची बातमी समोर येतेय.
Maharashtra News Today: छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांदरम्यान मोठा राडा झाल्याची बातमी समोर येतेय.
अतिक्रमण तोडण्यासाठी पोलिसांसह महापालिकेचं पथक या ठिकाणी गेले असता नागरिकांनी पथकावर दगडफेक केली. नागरिक आक्रमक झाल्याचे पाहताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जनतेला पिटाळून लावलं व परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांचे पथक व महापालिकेचे कर्मचारी सकाळीच अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले होते. स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिला मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या तसंच, जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली होती.
परिसरात अजूनही परिस्थीती पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाहीये. तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे सांगण्यात येतेय. या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतं. तसंच, अवैध धंदे चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टपरी चालकांना आणि जी घरे आहेत त्यांना नोटिसी देण्यात आल्या होत्या. मात्र नोटिस देऊनही घरे खाली करण्यात आली नव्हती. त्यामुळं अखेर पोलिस मोठा फौजफाटा घेऊन परिसरात दाखल झाले. व परिसरातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरू केले.
पोलिसांनी व महापालिकेच्या पथकाने बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक करत हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनीही बळाचा वापर करत लाठीचार्ज केला व अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. जे लोक दगडफेक करत होते त्यांना हिसकावून लावले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणाव आहे, अशी माहिती समोर येते आहे.