मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरु असणाऱ्या घडामोडी नेमक्या कधी कोणतं वळण घेतील याचा काही नेमच नाही. सध्या अशीच धक्कादायक आणि विचार करायला भाग पडणारी घटना समोर आली आहे. जिथं खासदार, छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यामुळं तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. (sambhaji raje bhosale )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी तुळजाभवानी मंदिरात गेलं असता छत्रपती संभाजीराजे यांना नियमांची यादी दाखवत गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर जे घडलं त्याचे पडसाद आता राज्यातून आणि संभाजीराजे समर्थकांमधून उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, मंदिराचं आणि देवीचं महत्त्वं पाहता हे पावित्र्य अबाधित रहावं आणि देवस्थळी कोणत्याही वादाची ठिणगी पडू नये, यासाठी संभाजीराजे मुखदर्शन घेऊनच मंदिर परिसरातून निघाले. पण, हे प्रकरण इथंच थांबलं नाही. 


तिथं राजे मंदिरातून निघाले आणि इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते, समर्थक प्रचंड आक्रमक झाले. संभाजीराजेंना मंदिर प्रशासनानं दिेलेली वागणूक संतापजनक असून, तहसीलदार आणि संबंधिक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीची त्यांनी केली. 


'जय भवानी, जय शिवाजी या नावानं महाराष्ट्राची सत्ता बदलते, पण भवानीदेवीच्या मंदिरात छत्रपतींच्या वंशजानांच प्रवेश नाकारला जातो तर, इथं सर्वसामान्यांना कशी वागणूक मिळत असेल', असा संतप्त सूर समर्थकांनी आळवला. 


संभाजीराजेंना मिळालेल्या या वागणुकीनंतर त्यांनी मंदिरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करत त्यांना सणसणीत भाषेत सुनावलं. ज्यानंतर ते तिथून संपातातच निघून गेले. 


दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर आता मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाच्या मागणीनं जोर धरला आहे. इतकंच नव्हे तर निलंबनाची कारपवाणी न झाल्यास बोबं मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला.