समृद्धी महामार्गावर अवघ्या 9 महिन्यात 1 हजार 282 दुर्घटना, `इतक्या` जणांनी गमावले प्राण
Samruddhi Mahamarg Accidents: डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना झाल्या आहेत.
Samriddhi Highway Accidents:15 ऑक्टोबरला झालेल्या भीषण अपघातानंतर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान समृद्धी महामार्गाबद्दलची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना झाल्या आहेत. ज्यामध्ये 67 वाहन अपघाताच्या घटना आहेत. यामध्ये एकूण 135 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यातील 37 जणांचा मृत्यू हा मोठ्या दुर्घटनेत झाला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने यासंदर्भात माहिती दिली. जुलै महिन्यात दारुच्या नशेत बेधुंद चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर एका खासगी एसी स्लीपर बसला आग लागली. 15 ऑक्टोबरच्या एका घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जण जखमी झाले.
एमएसआरडीसीने यासंदर्भात ताजी आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार नऊ महिन्यांत, सुमारे 48 लाख वाहनांनी नागपूरपासून इगतपुरीतील भरवीरपर्यंत 600 किलोमीटर अंतरावर प्रवास केला आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात झाल्याचा आरोप होत आहे. तथापि, एक्स्प्रेसवेमध्ये कोणताही इंजिनीअरिंग दोष नाहीत असे सांगून अधिकार्यांनी याचे खंडन केले. आंतरराष्ट्रीय रस्ता सुरक्षा गुणांसह बांधलेल्या महामार्गांपैकी एक आहे, असेही सांगण्यात येते.
समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या इतर राज्य महामार्गांच्या तुलनेत कमी आहे,असेही म्हटले जातेय. यावर्षी ऑगस्ट 2023 पर्यंत 855 अपघात झाले. त्यापैकी 51 जीवघेण्या अपघातांची नोंद झाली असून त्यात 106 जणांचा मृत्यू झाला आहे.
23 ऑगस्ट 2023 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या (एचसी) नागपूर खंडपीठाने समृद्धी द्रुतगती मार्गावरील वाहतूक योग्य होईपर्यंत तात्पुरती थांबवण्याच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांना नोटीस बजावली.
अपघातामागील कारणे
नियंत्रण गमावणे, घसरणे, टायर फुटणे, यांत्रिक अपयश, आग, वेगाने गाडी चालवणे आणि मागून टक्कर ही कारणे समोर आली आहेत.