Eknath Shinde :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र (Maharashtra News) दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये मोदींच्या हस्ते 75 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. यामध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंदीतून भाषण केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknaths shinde) यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. उद्घाटनाच्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदेंनी (eknath shinde) या महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि  देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली. मात्र, त्याचवेळी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय. तर, शेतकऱ्यांसाठी 1200 पेक्षा जास्त तलाव निर्माण केले आहेत. सुरूवातीला भूसंपादनासाठी खूप विरोध झाला, खूप अडचणी आल्या, लोकांनी जमिन देऊ नये म्हणून अनेकांनी विरोध केला. पण मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा लोकप्रकल्प पूर्ण केला. जमिन अधिग्रहण आम्ही रेकॉर्ड टाइममध्ये केलं. वन्यप्राण्यांसाठी समृद्धी महामार्गावर अंडरपास तयार करण्यात आले आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान दिली.


वाचा : अनेक रस्ते बॅरिकेड लावून बंद तर अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या सविस्तर माहिती   


आता समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत सुरू झाला आहे. पुढील दहा महिन्यात मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचले. महाराष्ट्राची भाग्यरेशा बदलणारा समृद्ध महामार्ग आहे. याच्या दोन्ही बाजूला आम्ही नवे नगर बनवण्याच प्रयत्न करतोय. लाखो लोकांना रोजगार देणारा हा समृद्धी हायवे होईल, असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


त्याचबरोबर तुम्ही रेल्वे, रस्त्यांसाठी लाखो, कोट्यवधी रुपये देण्याची तरतूद केली आहे. आगामी काळात आम्हाला मदत हवी आहे. आमच्या महाराष्ट्रात उद्योग यावे, मोठाले प्रकल्प यावे, लोकांना रोजगार मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंतीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.