Mumbai Nagpur Expressway:  मुंबई ते नागपूर 701 किमीचं अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरु झाल्यावर ट्रेनपेक्षा सुपरफास्ट प्रवास होणार आहे.  ठाणे ते इगतपुरी 76 किमी मार्ग हा समृद्धी महामार्गावरील शेवटचा सर्वात चॅलेंजिग टप्पा आहे. या टप्प्याचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून महिनाभरात संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरु होण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा... ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महामार्ग 700 किलोमीपेक्षा मोठा असाहा मुंबई ते नागपूरला जोडणारा आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग 390 गावांमधून जाणार आहे. समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 6 तासांत पूर्ण होणार आहे. या मार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.  


हे देखील वाचा... 390 गावे,10 जिल्ह्यांतून जाणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग, हेलिपॅडचीही व्यवस्था; एका वेळी 4 हेलिकॉप्टर लँड होतील


समृद्धी महामार्गील नागपूर ते शिर्डी या 520 किमी लांबीच्या पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. यानंतर शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांबीचा टप्पा देखील सुरु झाला आहे. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. आता प्रतिक्षा आहे ती महत्वाच्या टप्प्याची.  76 किमी लांबीच्या इगतपुरी ते आमणे मार्ग हा समृद्धी महामार्गील शेवटचा टप्पा आहे. या टप्पा सुरु झाल्यावर मुंबई ते नागपूर सहा तासांचा सुपरफास्ट प्रवास होणार आहे. यामुळे प्रवासी तसेच वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.. 


समृद्धी महामार्गाच्या इगतपूरी ते आमणे ठाणे दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याचं 98 टक्के काम पूर्ण झालं आहे. या टप्प्यात इगतपुरी, खुटघर शहापूर व आमणे येथे इंटरचेंज देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील अंतिम टप्पा इंजिनीयर्ससाठी मोठे चॅलेंज आहे. कारण या टप्प्यात तब्बल 17 दऱ्या आहेत. येथे तब्बल 17 पुल उभाण्यात आले आहेत. यांची एकत्रित लांबी तब्बल 11.5 किमी आहे. भातसा नदीवर सर्वाधिक लांबीचा  2.28 किमी  लांबीचा व्हॅलीपूल देखील उभारण्यात आला आहे.