Samruddhi Mahamarg Terror Video: समृद्धी महामार्ग आपल्या अपघातांसाठी चर्चेत असतो. पण आता महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडीओ चर्चेत आलाय. एक हादरवून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय त्यात  कार चालकाची दादागिरी पाहायला मिळतेय. नेमका काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गावरील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत साईडने कार का नेऊ देत नाही? म्हणत एक कारचालक वाद घालताना दिसतोय. टोल नाक्यावर पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रकार समृद्धी महामार्गावर पाहायला मिळाला.  


पाहा व्हिडीओ



गन लोड करत पळणाऱ्या कारचालकाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  


समृद्धीच्या दुसरबीड इंटरचेंजवर ही घटना घडली असून कारचालकाला पिस्तूलसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार चालकावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Mumbai| समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 7 जण ठार


समृद्धी महामार्गावर अपघात होण्याच्या बातम्या काही दिवसांनी ऐकायला येतात. गेल्या आठवड्यातच येथे एका भीषण अपघाताची बातमी समोर आली होती. या अपघातात 7 जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले होते. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना समोर आली होती. ज्यात 2 कारची समोरा समोर धडक बसली.  नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या आर्टीगा कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली.  स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर अर्टीगा आणि स्विफ्ट डिझायर या दोन्हीही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती देण्यात आली. 
भीषण अपघातानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.