सांगली : लग्न ठरलं मुहूर्तमेढ झाली मात्र लग्नाच्या तारखेच्या अगोदरच पुराने घराला वेढा घातला. मात्र ठरलेल्या तारखेलाच विवाह करायचा असल्यामुळे बोटीतून वरात काढतात सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. महापुराच्या पाण्यात बोटीतून काढलेल्या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा फटका बसला आहे. निम्मे सांगली शहर हे पाण्याखाली गेले होते.  हौसेला काही मोल नसतं असं सांगलीत घडलंय. सांगलीतल्या गावभाग मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपली वरात चक्क पाण्यातून लग्नाची वरात बोटीतून काढली. सध्या नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या रस्त्यावरून लग्नाची वरात संकल्प फोंडेशनच्या बोटीतून नेली.


 



 सांगली शहरातील गाव भागात राहणाऱ्या रोहित सूर्यवंशी आणि सोनाली बल्लारी यांचा विवाह अनोखा अविस्मरणीय ठरला. २६  तारखेला रोहित आणि सोनाली यांचा विवाह ठरला. मात्र लग्नाच्या तारखेच्या अगोदरच सांगली शहराला महापुराचा फटका बसला. गावभागातील अनेक घरात पाणी शिरलं रोहित सूर्यवंशी यांच्या घराला तर पाण्याने चारी बाजूंनी वेढा दिला. मात्र नियोजित तारखेलाच विवाह करायचा असल्यामुळे बोटीतून बाहेर येऊन रोहित आणि सोनाली यांचा अनोखा विवाह संपन्न झाला. संकल्प फोंडेशनच्या कार्यकर्त्यांच सहकार्याने नववधू आणि नववर यांची बोटीतून वरात काढण्यात आली आणि नववधू सोनालीचा गृहप्रवेश झाला.



सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा विळखा बसला आहे. सांगलीची परिस्थिती अतिशय हृदयद्रावक आहे. असं असताना सांगलीत नववधूचा अनोखा गृहप्रवेश झाला आहे.  महापुरात बोटीतून नवरदेवाने वरात काढली आहे.  सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल. 


सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा विळखा बसलाय. निम्मे सांगली शहर हे पाण्याखाली गेले आहे. एकीकडे आपल्या कुटुंबाची चिंता पुरग्रस्त सांगलीकरांना लागलेली असतानाच हौसेला काही मोल नसतं असं घडलंय. सांगलीतल्या गावभाग मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपली वरात चक्क पाण्यातून लग्नाची वरात बोटीतून काढली. सध्या नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मारुती चौक येथे सम्पूर्ण दुकानगाळे पाण्यात गेली असताना लग्नाची वरात संकल्प फाऊंडेशनच्या बोटीतून नेली.न