सांगली : सांगली जिल्ह्यात जत इथे जिलेटीनच्या कांड्या, स्फोटकांचं साहित्य आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. पारधी तांड्यावर कोंबिंग ऑपरेशन करून जत पोलिसांनी ही कारवाई केलीयं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा वर्षातल्या सर्वात मोठ्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहा जिलेटीन कांड्या, गॅस कटर, गॅस शेगडी, तीन कटावण्या, लोखंडी पाईप, वायर, लोखंडी पाने, दोन लोखंडी प्लग पाने, दोन फ्रेम, एक्सा ब्लेड,  फेशर बेल्ड, आठ कटरचे ब्लेड, नायलान दोरी, दोन रेग्यूलटर, दोन पाईप कटिंग करण्याचे गँस कटर आणि सहा मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलिसांची मोहिम


घरफोडी सारख्या गंभीर गुन्हातील संशयित शिवाजी प्रल्हाद चव्हाण, संतोष प्रल्हाद चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोन पोलिस निरीक्षक, पाच सहायक पोलिस निरीक्षक, दोन दंगल नियत्रंण पथकासह सुमारे १५० पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.


जत तालुक्यातील रेकार्डवरील गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यात तांड्यावरील सर्व घरांची झडती घेण्यात आली.  जिल्हाभर धुडघूस घालत असलेल्या दुचाकी चोरी, घरफोडीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.


त्या अनुषंगाने रेकार्डवरील गुन्हेगार असणार्‍या तांड्यावरील घरे तपासण्यात आली. दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे.