वापरेलं किट रस्त्यावर फेकलं; रुग्णवाहिका चालकाला स्थानिकांचा चोप
रुग्णवाहिका चालकाला अडवलं आणि रुग्णवाहिकेची केली तोडफोड...
सांगली : राज्यात कोरोनाचा संसर्गा वाढत असताना प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. सर्वसामान्य तर सोडाच परंतु डायग्नोनस्टिक सेंटरच्या कर्मचारीदेखील नीट नियमांचे पालन करत नसल्याचे लक्षात आले आहे.
सांगलीमध्ये आदित्य डायग्नोनस्टिक सेंटरनं वापरलेले पीपीई किट उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णवाहिकेतून हे वापरलेले पीपीई किट्स आणि वैद्यकीय कचरा गणेशनगर परिसरात टाकण्यासाठी आणला होता.
यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला अडवलं आणि रुग्णवाहिकेची तोडफोड केली.. दरम्यान पीपीई किट्स उघड्यावर टाकल्याप्रकरणी महापालिकेनं संबंधीत रुग्णालयाला एक लाखांचा दंड ठोठावलाय.