मुस्तान मिर्झा, झी २४ तास, उस्मानाबाद : दहावीत शिकत असताना तिच्या वडिलांनी आत्महत्या केली...  पण ती खचली नाही तर लढली... आईबरोबर रात्री शेतात राबली... पण अभ्यासाची जिद्द सोडली नाही... उस्मानाबादच्या सुषमाचा हा संघर्ष... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक संकटं आली पण ती खचली नाही... उस्मानाबादमधल्या लोहटा पूर्वा गावाची सुषमा अभंग... गेल्या वर्षी नापिकीला कंटाळून सुषमाच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांच्यानंतर दोन मुलांची जबाबदारी आईनं पेलली... कोरडवाहू जमिनीवर रात्रंदिवस आई आणि दोन पोरं राब राब राबली.... पुन्हा घर उभं करायचं, या जिद्दीनं सुषमानं अभ्यास केला... तिला दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.६० टक्के मिळाले.


फक्त कोरडवाहू जमीन, एवढंच अभंग कुटुंबीयांचं रोजीरोटीचं साधन... जेमतेम एकवेळची भूक भागते... आता सुषमासमोर शिकायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच या गुणवंत विद्यार्थिनीच्या संघर्षाला साथ द्या...



संघर्षाला हवी साथ


प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा.


झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३


संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९