सांगली : ट्रॅक्टर- क्रूझरच्या झालेल्या अपघातात ६ पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ६ पैलवान गंभीर जखमी आहेत. खडेगाव-वांगी येथे ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली क़ेगावातील वांगी येथे हा अपघात घडला आहे. जखमींवर जवळच्या मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास वांगी येथील शिरगाव फाट्यावर हा भीषण अपघात घडला. यामध्ये क्रूझरचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. मध्यरात्री तात्काळ उपचाराची सोय न झाल्याने पैलवानांचा मृत्यू झाल्याचे एका जखमी पैलवानाने सांगितले. 


मृत्यू झालेले ६ जण क्रांती क्रिडा संकुलाचे पैलवान होते. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. 


आकाश देसाई,विजय पाटील, सौरभ माने आणि शुभम घारगे अशी या मृत पैलवानांची नावं आहेत.