Sangli: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटाचे नेते याआधी एका पक्षात एकत्र सत्तेत असल्याने एकमेकांची गुपितं त्यांना चांगल्याप्रकारे ठावूक आहेत. फक्त कोणतं गुपित कधी बाहेर काढायचं? आणि कोणतं गुपित गुपितंचं राहू द्यायचं? हे नेतेमंडळी ठरवतात. आपल्या सोयीनुसार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.


विमानतळ का होऊ शकले नाही?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी सांगलीतील विमानतळाची जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. नुकत्याच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत येऊन विमानतळ का होऊ शकले नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता.यावरून उद्योग मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 


आपण उद्योग मंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द


अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना विमानतळ का करता आले नाही? असा प्रश्न उदय सामंत यांनी विाचारला. तत्कालीन उद्योग मंत्र्यांकडून 66 एकर विमानतळाची सांगलीची जागा गुजरातच्या एका व्यापाऱ्याला विकण्यात आली होती. पण आपण उद्योग मंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचा गौप्यस्फोटमंत्री सामंत यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई हे त्यावेळी उद्योगमंत्री होते.


उद्धव ठाकरे काँग्रेसमय 


सांगलीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला जाणं पसंत केलं मात्र सांगलीतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देऊ शकले नाहीत. त्यामुळे ते किती काँग्रेसमय झाले आहेत, हे यावरून स्पष्ट होतं,अशी टीका देखील सामंतांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.