सांगली : सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने कंबर कसली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती ठिकठिकाणी नाकेबंदी होती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तरीही झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडी त्या पठारावर गनिमी काव्याने बैलगाडी शर्यत पार पडली. जाहीर केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या ऐवजी गनिमीकाव्याने अन्य ठिकाणी बैलगाडी शर्यत होईल याबाबतचे वृत्त सर्वात अगोदर झी 24 तास ने सर्वात अगोदर दाखवलं होतं. ते तंतोतंत खरे ठरले असून सर्व यंत्रणा कल्पनाही न होता बैलगाडी शर्यत पार पडली आहे. 



सांगलीत गनिमी काव्यानं झरे गावच्या हद्दीवर पार पडली बैलगाडा शर्यत, झी 24 तासचं वृत्त तंतोतंत खरं ठरलं आहे.  सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडी शर्यत पार पडली आहे.  प्रशासनाला हुलकावणी देत गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत भरवण्यात आली आहे.  झी 24 तासचं वृत्त तंतोतंत खरं ठरलं आहे.  जाहीर केलेल्या शर्यतीऐवजी गनिमीकाव्याने शर्यत झाली आहे.