सांगलीत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्याला आईने फेकले विहिरीत आणि...
Sangli Extra Marrital News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्दयी आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या लहान मुलाला विहिरीत फेकून दिले.तिने ही घटना दडपण्यासाठी बनाव रचल्याचे पुढे आले आहे. विटा पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर नक्की काय घटना घडली याचा उलगडा झाला आहे.त्यानंतर पोलिासांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली.
Sangali Mother Killed Son For Immoral Relationship: सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या सहा वर्षांच्या मुलाला निर्दयी आईने प्रियकराच्या मदतीने विहिरीत फेकून दिले. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. तिने ही घटना दडपण्यासाठी बनाव रचल्याचे तपासात पुढे आले आहे. विटा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तिने आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र, पोलिसांनी घटनेचा उलगडा केला आहे. मुलाची हत्या आईनेच केल्याचे तपासात पुढे आले आहे. विटा पोलिसांनी याप्रकरणी दोघांनाअटक केली आहे. अनैतिक संबंध आणि लग्नात अडसर ठरत असल्याने विहिरीत फेकून मुलाला संपवल्याची माहिती पुढे आल्यानंतर खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात एकच खळबळ उडाली आहे.
खानापुरच्या लेंगरे या ठिकाणी राहणाऱ्या ज्योती ( 28) या विवाहित महिलेने आपल्या पोटच्या सहा वर्षांचा मुलाचा प्रियकराच्या मदतीने निर्देपणाने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा विहिरीत फेकून देऊन हत्या केल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणी विटा पोलिसांनी ज्योती आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे ( 25) या दोघांना अटक केली आहे. या दोघांचे गेल्या काही वर्षापासून संबध असल्याची माहिती पुढे आली आहे.
लेंगरे या ठिकाणी राहणाऱ्या ज्योती या विवाहित महिलेचे रुपेश घाडगे या तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण जुळले होते. या दोघांनाही त्यांच्या अनैतिक संबंधात आणि लग्नासाठी मुलगा हा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून मुलाचा काटा काढण्याचा प्लान आखला. त्यानुसार मुलाला गावातल्याच एका विहिरीमध्ये जिवंतपणे फेकून दिले. त्यानंतर मुलाचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, मुलाच्या आईने विटा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन आपल्या अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवलीत. त्यानंतर गावातील विहिरीमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये मुलाची आई ज्योती लोंढे आणि रुपेश घाडगे या दोघांचेही अनैतिक सबंध समोर आले. यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
6 मे रोजी माझ्या मुलाला कोणतरी पळवून नेले आहे, अशी तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण केल्याची तक्रार नोंदवून घेतली. त्याआधी प्रियकर रुपेश याच्या मदतीने मुलाला दुचाकीवरुन नेऊन एका विहिरीत फेकून दिले होते, अशी माहिती पुढे आली आहे. दोघांनीही मुलाच्या खुनाची कबुली दिली. दोघांनाही विटा पोलिसांनी अटक केली आहे,अधिक तपास विटा पोलीस करत आहेत.