पुणे : पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर अटकेची कारवाई झाली आहे. डीएसके ग्रुप कंपनी मार्फत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात डी. एस कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुलकर्णी यांच्यावर केली अटकेची कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली पोलिसांनी कुलकर्णी कुटुंबाला येरवडा तुरुंगातून ताब्यात घेतलं. सांगलीतील काही ठेवीदारांची डीएसके ग्रुपकडून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. डी.एस कुलकर्णी आधीच अटकेत होते. डीएसके गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राचे 3 अधिकारी आणि डीएसकेंच्या एका अभियंत्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली होती.


डीएसकेंना बेकायदेशीररित्या कर्ज दिल्याचा ठपका ठेवत बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर.पी.मराठे, तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन.एस.देशपांडे, माजी एमडी सुशील महुनोत आणि डीसके डेव्हलपर्सचे मुख्य अभियंते राजीव नेवासकर यांची चौकशी करण्यात आली होती. कर्ज देताना कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. बेकायदेशीरपणे सार्वजनिक पैशांचा वापर करण्यात आल्याने नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली.