सांगली : अनिकेत कोथळे प्रकरणी गुन्हेगार वर्दीतील असो किंवा बाहेरचे त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच असा इशारा सांगलीच्या नुतन पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिलाय. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर सुहेल शर्मा हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


जनतेच्या मनातील पोलिसिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांचं स्वागत केलं. जनतेच्या मनातील पोलिसिंग यापुढे दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी शर्मा यांनी दिलाय. 


शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा


दरम्यान अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला आणि पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आलीय. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीची कारवाई झाली असली तरी, उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करा, या मागणीवर सर्व पक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते ठाम आहेत. यासाठी कृतीसमितीने शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केलाय.