सांगली पोलिसांचा मध्य प्रदेशमध्ये छापा, नऊ पिस्तुल जप्त
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्य प्रदेश छापा मारुन एकाला अटक केलीय. पोलिसांनी या कारवाईत नऊ पिस्तुल जप्त केल्यात. प्रतापसिंग भाटिया या आरोपीलाही अटक करण्यात आलीय.
सांगली : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्य प्रदेश छापा मारुन एकाला अटक केलीय. पोलिसांनी या कारवाईत नऊ पिस्तुल जप्त केल्यात. प्रतापसिंग भाटिया या आरोपीलाही अटक करण्यात आलीय.
या छापेमारी दरम्यान एक पोलिस कर्मचारी जखमी झालाय. यावेळी आरोपीनं पोलिसांवर हल्ला केला. मात्र पोलिसांनी धाडस दाखवत आरोपीला अटक केलीय. याआधी सात पिस्तुल सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी जप्त केल्या होत्या.
या तपासा दरम्यान ही हत्यारे मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती सांगली पोलिसांना लागली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशमधील धामनोद या गावी छापा टाकून ही कारवाई केली. आतापर्यंत सांगली पोलिसांनी एकूण 16 पिस्टल 27 काडतुसं जप्त केली आहेत.