COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली :  सांगलीत आता एका नव्या कोंबड्याची चर्चा आहे. एक कोंबडा उठतो अण्णा अण्णा म्हणून ओरडतोय हे तुम्ही ऐकलं असेल. आता सांगलीत चर्चा रंगलीय आणखी एका कोंबड्याची ..... हे कोंबडं  सकाळी सकाळी उठतंय आणि काका काका ओरडत सुटतंय. सांगली शहरातल्या शंभर फुटी रोड वर राहणार्या वसंत कांबळेंचे हे कोंबडं आहे. सकाळ झाली की ते काका काका म्हणून ओरडतंय. मग त्याचे कांबळे काका येतात आणि त्याला खायला देतात.


मालक नजरेआड झालं की..


वसंत कांबळे यांना पाळीव प्राण्यांची भारी आवड आहे. त्यांच्य़ा घरी ३ शेळ्या , ५ म्हशी, १ मांजर , २ कुत्री, ४ कोंबड्या , २ कोंबडे असं सगळं गोकूळ आनंदानं नांदतंय.... अगदी पोटच्या पोरागत वसंत कांबळेंना या प्राण्यांचा लळा..... कोंबड्याचा पण मालकावर लई जीव.... जरा का मालक नजरेआड झालं की हा लगेच काका काका करायला लागतोय.... काका समोर येऊन उभारले की मग कुठं याचा जीव शांत होतोय.


कोंबड्याचं स्वरयंत्रात प्रॉब्लेम


हा कोंबडा अचानक पोपटावानी मिमिक्री का करु लागला म्हणून जरा डॉक्टरकडे चौकशी केली तर डॉक्टर म्हणतात या कोंबड्याचं स्वरयंत्रात प्रॉब्लेम आहे. 
काही पण म्हना... सांगलीतले कोंबडे सध्या लई वस्ताद झालेत. अण्णा म्हणून काय ओरडतात, काका म्हणून काय ओरडतात. तेवढेच सांगलीचे कोंबडे जगात फेमस होतायत.