हातात हत्यार घेऊन भाजप इच्छुक उमेदवार पसरवतोय दहशत
सांगलीत दहशत माजवण्याचा प्रयत्न
सांगली : सांगली महापालिका निवडणुकीतला भाजपचा इच्छुक उमेदवार दिवसाढवळ्या हातात सत्तुर नावाचं हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याचं उघड झालं आहे. सुयोग सुतार साथीदारासह बाईकवरून येऊन हातात सत्तुर घेऊन दहशत माजवत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. सुतार विरोधात अपहरण, मारहाण, धमकावणे, हे गुन्हे दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
आपल्या घरासमोर येऊन सुतार हा हातात सत्तुर घेऊन दहशत माजवत असल्याची, तसंच फोनवरून धमकावत असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केली आहे. सुतारसह चार जणांविरोधात दोन तक्रारदारांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.