पुणे : आजच्या कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरेंनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर 'स्वबळावर लढले तर शिवसेनेचा मनसे होईल' भाजप खासदार संजय काकडे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदारही मोदी लाटेत निवडून आले होते... शिवसेना वेगळी लढली तर २०१९ ला पाच खासदार निवडून येणंही कठिण आहे, असं म्हणत संजय काकडेंनी सेनेला टोला हाणलाय.   


भाजपच मोठा भाऊ आहे... २०१९ ला भाजप लोकसभेला २८ खासदार  आणि १६५ आमदार निवडून येतील, असं भाकितही काकडेंनी यावेळी केलंय. 


स्थानिक पातळीवर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे निर्णयाचा फेरविचार करतील, असा न मागताच सल्लाही काकडेंनी शिवसेनेला दिलाय. 


शिवसेना आणि भाजपनं लोकसभेला एकत्र लढावं मात्र विधानसभेला वेगवेगळं लढावं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.